X प्लॅटफॉर्मवर लवकरच पाहता येणार चित्रपट

 X प्लॅटफॉर्मवर लवकरच पाहता येणार चित्रपट

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नावीन्यपूर्णतेसाठी जगप्रसिद्ध असलेले Space X चे सीईओ एलॉन मस्क नुकतीच एक एक मोठी घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) युझर्स चित्रपट, टीव्ही मालिका आणि पॉडकॉस्ट पोस्ट करु शकतील. मोनेटायझेशनच्या (Monetization) माध्यमातून पैसा कमावू शकतील. एलॉन मस्क आणि त्याची बहिण टोस्का मस्क या दोघांमधील सोशल मीडियातील संवादातून ही बातमी समोर आली आहे. तिच्या प्रश्नाला मस्क याने उत्तर दिले आहे. त्यात त्याने चित्रपट, टीव्ही मालिका, पॉडकॉस्ट एक्सवर पोस्ट करण्याची माहिती दिली आहे.

एलॉनची बहिण टोस्काने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आता एक्सवर सुद्धा चित्रपट पाहता येईल, ही चांगली गोष्ट आहे. काही युझर्सने लागलीच विना सब्सक्रिप्शन चित्रपट पाहण्यासाठी युझर्सला वन टाईम शुल्क ठेवण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय एलॉन मस्क त्याच्या फॉलोअर्ससाठी एआय ऑडियन्स हे फीचर पण घेऊन येत आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत लागलीच पोहचू शकता. एआय सिस्टम काही सेकंदात जाहिरातीसाठी मदत करेल. तुमच्या इच्छित ऑडियन्सपर्यत पोहचण्यासाठी मदत करेल.

X वर Adult Content साठी युझर्स कम्युनिटी तयार करु शकतील. त्यांना सेटिंगमध्ये याविषयीची माहिती लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याविषयीचा स्क्रीनशॉट ॲनालिस्ट Daniel Buchuk यांनी शेअर केला आहे. डॅनिअल ॲप्स विकसाबाबत माहिती जमा करतो आणि त्याविषयी युझर्सला अपडेट देतो. एक्सच्या सेटिंगमध्ये लवकरच साधं कंटेंट तर प्रौढ कंटेंट अशा नामफलक, लेबल लागलेले असेल. ते युझर्सच्या सहज नजरेत येईल.

SL/ML/SL

11 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *