सरकारी तेल कंपन्यांना १२ हजार कोटींचा नफा

 सरकारी तेल कंपन्यांना १२ हजार कोटींचा नफा

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंधनासाठी लागणारे खनिज तेल सरकारी महसूलाचे एक मोठे माध्यम आहे. दररोज ठरणाऱ्या या खनिजतेल दरावर देशाचे अर्थचक्र मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी सरलेल्या आर्थिक वर्षातील मार्च तिमाहीतअखेर १२ हजार ९८६.९ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा मिळवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपन्यांनी २१,३२०.०२ कोटी रुपये मिळवले होते. तर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये या कंपन्यांनी ८६,००० कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे.

खनिज तेलाच्या वाढलेल्या आणि अस्थिर किंमतींमुळे जानेवारी-मार्च या कालावधीत सरकारी तेल विपणन कंपन्यांच्या नफ्यात घसरण झाली आहे.कॅलेंडर वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत खनिज तेलाच्या किमती १६ टक्क्यांनी वधारल्या आहेत. चौथ्या तिमाहीत इंडियन ऑइलच्या निव्वळ नफ्यात ४९ टक्क्यांची घसरण झाली असून तो ५,४८७.९२ कोटी रुपयांवर पोहोचला.

मार्च तिमाहीत भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या एकत्रित निव्वळ नफ्यात अनुक्रमे ३० टक्के आणि २५ टक्के घट झाली आहे. मार्च महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर २ रुपयांची कपात केली होती, ज्याचा कंपनीच्या विपणन मार्जिनवर परिणाम झाला.

ML/ML/SL
11 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *