हे आहे देशातील सर्वाधिक प्रदुषित शहर
मुंबई,दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या शहरीकरणामुळे देशातील प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मागील आठवड्यात केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वांधिक प्रदुषित शहरांची यादी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, बिहारमधील कटिहार हे शहर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलं आहे. भारतातील सर्वाधिक प्रदूषित १६४ शहरांच्या यादीत कटिहार हे शहर अव्वल क्रमांकावर असून येथील एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात एक्यूआय हा ३६० इतका नोंदला आहे.
इंडियन अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (IARI) च्या एका अहवालानुसार, पीक काढून घेतल्यानंतर शेतकरी अनेकदा शेतातील पाचोळा गोळा करण्याऐवजी जाळून टाकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं.
कटिहारनंतर दिल्लीचा एक्यूआय ३५४ असून नोएडाचा एक्यूआय ३२८ आणि गाझियाबादचा एक्यूआय ३०४ नोंदला गेला आहे. तर बेगुसराय (बिहार), वल्लभगढ, फरिदाबाद, कैथल, हरियाणातील गुरुग्राम आणि मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर या शहरांमध्ये वायू प्रदूषण सर्वाधिक आहे.
16 Nov. 2022