असे आहे या वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण

 असे आहे या वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण

मुंबई दि , दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यावर्षीचे शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण येत्या २८,२९ तारखेला होत आहे. ग्रहणाचा काळ अश्विन शुद्ध १५, शनिवार दिनांक २८/२९ ऑक्टोबर २०२३ असून ग्रहण पर्वकाल — १ तास १८ मिनिटे, स्पर्श रात्री १-०५ , मध्य रात्री १-४४, मोक्ष रात्री २-२३.

हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे

युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, उत्तर/पूर्व-दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंद महासागर, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकासह विविध क्षेत्रांमध्ये दिसेल.

चंद्रग्रहण भारतात दिल्ली, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, कोल्हापूर, कोलकाता आणि लखनौ, मदुराई, मुंबई, नागपूर, पाटणा, रायपूर, राजकोट, रांची, आग्रा, रेवाडी, अजमेर, शिमला, सिल्चर, उदयपूर, उज्जैन, चेन्नई., हरिद्वार, द्वारका, मथुरा, हिसार, वडोदरा, वाराणसी, प्रयागराज, बरेली, कानपूर, अहमदाबाद, अमृतसर, बेंगळुरू भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, लुधियाना यासह अनेक शहरांमध्ये दृश्यमान होईल

कोजागिरी आणि ग्रहण

वेधकाळात प्रतिवर्षी प्रमाणे रात्रीचे वेळी श्री लक्ष्मी देवी आणि श्री इंद्र देव यांचे पूजन करून दुधाचा नैवेद्य दाखवता येईल. पूजा झाल्यावर प्रसाद म्हणून थोडे दूध प्राशन (प्यावे) करावे. राहिलेल्या दूधात तुळशी पत्र घालून ठेवावे आणि दुसरे दिवशी प्यावे.

जितेश सावंत

के. पी. विशारद , नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant)

शेअर बाजार तज्ञ/ सायबर कायदा(cyber law) अभ्यासक

ML/KA/PGB 25 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *