विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले, सकाळी अकरा वाजता विधानसभा कामकाजाची सुरूवात वंदे मातरम् ने झाल्यावर राज्य गीत ही वाजविण्यात आले.
सभागृहाचे सदस्य असलेल्या संदीपान भूमरे, वर्षा गायकवाड , राजू पारवे, निलेश लंके, प्रतिभा धानोरकर ,रवींद्र वायकर, प्रणिती शिंदे आदी सदस्यांनी लोकसभेवर निवडून गेल्यानंतर राजीनामा दिल्याची माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२३ – २४ वर्षाची राज्याची आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर केला.
या अधिवेशन काळासाठी कालिदास कोळंबकर, संजय शिरसाट , अमीन पटेल, किरण लम्हाटे आणि समाधान अवताडे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. शेवटी पांडुरंग पाटील सडोलिकर, प्रतापराव भोसले , मीनाक्षी पाटील , गंगाधर गाडे , त्र्यंबक कांबळे, दगडू गलांडे , डॉमनिक गोंसालविस , विश्वास गांगुर्डे आणि गंगाराम ठक्करवाड या दिवंगत माजी सदस्यांना सभागृहाने आदरांजली वाहिली , त्यांच्याबद्दल ची अधिक माहिती अध्यक्षांनी सभागृहात त्याआधी सादर केली आणि विधानसभेचे आजचे कामकाज संपले.
ML/ML/SL
27 June 2024