मोदींच्या गुलाम यंत्रणांनी कपट कारस्थान केले
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान मोदींच्या Prime Minister Modi गुलाम असलेल्या सरकारी यंत्रणांनी कपट कारस्थान करून आपले धनुष्यबाण चोरले आहे,ते परत मिळविल्या शिवाय मी गप्प बसणार नाही अशी ग्वाही उध्दव ठाकरे यांनी आज आपल्या समर्थकांना दिली.Modi’s slave system hatched a treacherous conspiracy
मुंबईत मातोश्री निवासस्थानाबाहेर रस्त्यावर गाडीतून उभे राहून त्यांनी हे मार्गदर्शन केले, शिवसेना स्थापनेच्या वेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जसे १९६८ साली गाडीवर उभे राहून भाषण केले होते त्याच पद्धतीने आज उध्दव ठाकरे यांनी भाषण केले.
आता माझ्या हातात काहीही शिल्लक राहिले नाही मात्र मी गप्प बसणार नाही, खचणार नाही , सर्व सामान्य शिवसैनिकांची ताकद माझ्या सोबत आहे , यामुळे पुढील लढाई आपणच जिंकू असे ते म्हणाले.
शिवरात्री च्या आदल्या दिवशी शिवधनुष्य चोरीला गेले आहे, ते पेलयायला ही ताकद लागते , ते मर्दाचे काम आहे, आता लढाई सुरू झाली आहे , निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. काल धनुष्यबाण हातात घेतलेल्या लोकांचे चेहरे पडलेले होते अशी टीका त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली.
ML/KA/PGB
18 Feb. 2023