समान नागरी कायद्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत.

 समान नागरी कायद्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत.

भाईंदर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  समान नागरी कायदा धर्मात हस्तक्षेप करेल असे गैरसमज पसरविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या कायद्याबद्दलचे गैरसमज दूर करुन सत्य लोकांसमोर आणण्यासाठी मुस्लीम राष्ट्रीय मंच व्यापक प्रमाणात जनजागृती करेल असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेशकुमार यांनी ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथे व्यक्त केले.Misconceptions are being spread about the Uniform Civil Code.

मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या दोन दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये करण्यात आले होते. त्याचा आज समारोप झाला. जम्मू काश्मिरमधून ३७० व ३५ अ कलम हटविण्यात आली. त्यामुळे जम्मू काश्मिरमधील तसेच देशभरातील मुस्लीमांचे कोणते नुकसान झाले, त्यांच्यावर कोणता अन्याय झाला असा प्रश्न विचारुन इंद्रेशकुमार यांनी सांगितले की एक देश एक कायद्याची गरज आहे.

मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या उत्तराखंड मधील सदस्यांनी यासंदर्भात सर्वेक्षण करुन अहवाल सादर केला आहे.  या कायद्याबद्दल अपप्रचार सुरु आहे. लोकांना भडकावण्याचे काम सुरु आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंच हा गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेईल असे इंद्रेशकुमार यांनी यावेळी सांगितले.

अभ्यास वर्गाला महराष्ट्राच्या ३२ जिल्ह्यातील २०० प्रतिनिधी उपस्थित होते. देश दहशतवाद मुक्त व्हावा यासाठी मुस्लीम राष्ट्रीय मंचाकडून एक कार्यक्रम आखण्यात आला आहे. हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी, राज्यात संघटना वाढावी तसेच संवेदनशील विषयावर सामंजस्य होण्यासाठी प्रयत्न वाढीस लागावे यासाठी या अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक इरफान अली पिरजादे यावेळी उपस्थित होते.Misconceptions are being spread about the Uniform Civil Code.

ML/KA/PGB
13 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *