बचत गटाच्या माध्यमातून थांबले ऊसतोड कामगार महिलांचे स्थलांतर

 बचत गटाच्या माध्यमातून थांबले ऊसतोड कामगार महिलांचे स्थलांतर

बीड, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्हा दुष्काळी आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र आता याच जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनू लागल्या आहेत.

बीड जिल्ह्यातल्या सिंधी येथील महिलां ऊसतोडणी साठी परराज्यात जात असत. यामुळे महिलांच्या मुलांचे शिक्षण थांबायचे आणि यात मुलांचे शैक्षणिक नुकसान व्हायचे.Migration of women sugarcane workers stopped through the cooperative society

का झाला बदल

कृषी विज्ञान केंद्र डिघोळ अंबा आणि नवचेताना संस्थेच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करून ४० महिलांना एकत्र करत सिद्धिविनायक बचत गटाची स्थापना करून दिली.

यामुळे महिलांचे स्थलांतर थांबले असून या महिला स्वतःच्या शेतात सेंद्रिय मूगाचे उत्पादन घेऊन त्याच मुगावर पारंपरिक पद्धतीने जात्यावर डाळ बनवण्याचे काम करत आहेत. त्यांना महिन्याला ६० हजार रुपयांपर्यंत आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने आनंदी आहेत.

सेंद्रिय शेतीचा फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या महिला सेंद्रिय शेतीकडे वळल्या असून स्वतःच्या एक एकर शेतात मुगाची सेंद्रीय शेती करत आहेत. निघालेल्या मुगाची पारंपरिक पद्धतीने
(जात्यावर) तीन प्रकारची डाळ बनवण्याचे काम या महिला करत असलयामुळे त्यांना आता रोजगार मिळू लागला आहे.

ML/KA/PGB
12 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *