मराठी भाषा भवन आणि उपकेंद्राचे काम पंधरा दिवसांत सुरू

नवी मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईतल्या चर्नीरोड इथे मराठी भाषा भवन आणि नवी मुंबईतल्या ऐरोली इथं उपकेंद्र अशा दोनही प्रस्तावित इमरतींच्या उभारणीच्या कामाला येत्या पंधरा दिवसांत सुरूवात होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नवी मुंबईत दिली. Marathi language

ऐरोली इथल्या प्रस्तावित मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या जागेची पाहणी करण्यासाठी सामंत आज नवी मुंबईत आले होते त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. या दोनही इमारतींच्या उभारणीसाठी 152 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये मराठी भाषा भवन साठी 126 कोटी तर ऐरोलीतल्या उपकेंद्रासाठी 26 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या प्रकल्पाला मान्यता मिळाली असून त्यातील 10 कोटी रूपये आले आहेत. कंत्राटदारही निश्चित झालेला आहे असे असतानाही हे काम अद्याप सुरू का झाले नाही याबाबत आज पाहणी करण्यात आली आहे. हे भवन मराठी भाषा विभागाशी निगडीत असले तरी एमआयडीसी काम करत आहे. आणि आपल्या खात्यांतर्गत एमआयडीसी येते तसंच राज्यमंत्री असताना मराठी भाषा भवनची रचना माहित असल्याने दोनही कामे तातडीने सुरू करण्याच्या दृष्टिने कालच बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार ही पाहणी करून या दोनही केंद्राची कामे पंधरा ते वीस दिवसांत सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मंत्री सामंत यावेळी सांगितलं.

साहित्य संस्कृती मंडळ, भाषेवर आधारित मंडळे, मराठी भाषेवर अभ्यास करणारी वाड्मय मंडळे यांच्या अध्यक्षांची कार्यालये ऐरोली इथे होणार आहेत. मराठी भाषेचे ग्रंथालय, संशोधन केंद्र चर्नी रोड इथे होणार आहे.

ML/KA/PGB
24 Nov .2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *