विश्व मराठी संमेलन सुरू
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे उदघाटन मुंबईत मराठमोळ्या पद्धतीने साजरे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीप प्रज्वलन करून संमेलनाच्या उद्घाटन सत्राचा आरंभ केला.
विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, आमदार आशीष शेलार, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, खासदार राहुल शेवाळे, हेमंत पाटील, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे जगातल्या प्रत्येक खंडातील, विविध देशांमधील आणि देशाच्या विविध राज्यातील सुमारे 1500 मराठी भगिनी-बंधू या विश्व मराठी संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहिले आहेत.
या संमेलनाच्या निमित्ताने काढलेल्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
ML/KA/PGB
4 Jan 2022