मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण मागे, आता साखळी उपोषण…

 मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण मागे, आता साखळी उपोषण…

जालना, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपले 17 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. समाजाचे म्हणणं होतं की तुम्ही तुमचे आमरण उपोषण स्थगित करावे त्यामुळे माझं उपोषण आज मी स्थगित करतोय,या आमरण उपोषणाचं आता साखळी आंदोलनात रूपांतर करतोय असे आज मराठा आरक्षण संघर्ष नेते मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे.

आता रोज 4 समाज बांधव या ठिकाणी साखळी उपोषणाला दिसतील. लोक सैरभैर झाले आहेत, मी व्यवस्थित आहे. समाजाच्या आग्रहखातर मी आता माझं आमरण उपोषण संपतोय, तुमचं काय म्हणणं आहे ते मी जाणून घेणार आहे. मी गावातील महिलांच्या हस्ते पाणी पिउन उपोषण सोडतोय असे त्यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.

रात्री 5 हजार महिला होत्या आणि 25 हजार लोक होते, देवेंद्र फडणवीस ला रात्रीच दुसरी अंतरवाली घडवायची होती. पहिला हल्ला देवेंद्र फडणवीसनेच केला होता. त्यानी पोलीस बाजूला सरावेत आणि सागर बंगल्याचा दरवाजा उघडा करावा,मी लगेच येतो. मी तुमचा चक्रव्यूह तोडला, काल उभे राज्य जळाले असते, मी कुठे रस्ता रोको केला, हे देवेंद्र फडणवीस चे चाळे आहेत असे आरोप त्यांनी यावेळी केले.

याचे परिणाम देवेंद्र फडणवीस ला भोगावे लागणार आहेत. तुम्हाला जड जाईल, तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. तुम्ही जनतेला वेठीस धरू नका असे ते म्हणाले. तुम्ही आता तरी कायद्याची अंमलबजावणी करा,सहन करायच्या पण मर्यादा आहेत. राजकारण आपल्या डोक्यातच नाही, नाही तर यांचे सीट आधीच पडले असते. मी समाजाने सांगितलं म्हणून पाणी घेतले,रात्रीचे डाव देवेंद्र फडणवीस ने रचले होते, ते उशिरा लक्षात आलं.तुम्हाला अजून पण संधी आहे,तुम्ही सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा अशी मागणी जरांगे यांनी यावेळी केली.

जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू…

दरम्यान जिल्ह्यातील इंटरनेट सेवा आज सायंकाळी 4:45 पासून पूर्ववत सुरू झाली. गत 6 तासांपासून इंटरनेट अभावी ठप्प पडलेली कामकाज, व्यवहार सुरळीत सुर झाल्याने असून जालनेकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा ही आज सकाळी 10 ते सायंकाळी 4:20 वाजे पर्यंत बंद करण्यात आली होती. ही इंटरनेट सेवा आता पूर्ववत सुरू झाल्याने जालनेकरांचा जीव भांड्यात पडला आहे.

ML/KA/SL

26 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *