मुंबई लोकलमध्ये युवतीचा अश्लिल डान्स, युजर्स संतापले

 मुंबई लोकलमध्ये युवतीचा अश्लिल डान्स, युजर्स संतापले

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दररोज, मुंबईच्या लोकल लाखो प्रवाशांच्या प्रवासाचे साक्षीदार आहे, ज्यामुळे ते मुंबईची जीवनरेखा म्हणून ओळखले जाते. मात्र, यापैकी एका लोकलमध्ये घडलेल्या घटनेने इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चालत्या लोकल ट्रेनमध्ये भोजपुरी गाण्यावर भडक नृत्य करताना एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नृत्यादरम्यान अनेक सहप्रवाशांनी अनुभवलेली अस्वस्थता व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे, काहींनी त्यांचे चेहरे देखील झाकले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरल्याने इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अशा वर्तनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे रेल्वेने या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे प्रकार

सोशल मीडियावल लाइक्स आणि व्यूज मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही पातळीपर्यंत जातात. सार्वजनिक ठिकाणी नको ते वर्तन करतात. आता मुंबईतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एक युवती मुंबई लोकलमध्ये भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहेत. युवती अचानक आपल्या जागेवरुन उठते आणि सेंसेशनल डान्स करु लागेत. युवतीच्या डान्समुळे शेजारी बसलेल्या प्रवाशांनाही लाज वाटू लागते. काही प्रवासी अस्वस्थ होऊन उठून दुसरीकडे निघून जाताना व्हिडिओत दिसत आहेत.

सोशल मीडियावर युजर्सने कठोर कारवाई मागणी केली आहे. रेल्वेचे नेहमीचे उत्तर पाहून काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. काही युजर्सकडून उपहासात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. एकाने गंमतीदारपणे म्हटले आहे, रेल्वेने आता तिकिटावर मनोजरंगन फ्री देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

In Mumbai local, girl’s obscene dance, users are angry

ML/KA/PGB
26 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *