मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पुन्हा सुरुवात…

जालना, दि. ८(एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे आजपासून पुन्हा अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषणाला बसले असून मराठा आरक्षणावरील हे त्यांचे चौथे उपोषण आंदोलन आहे.
हे आंदोलन सरकार ला मोडीत काढायाच आहे, असा आरोप जरांगे यांनी यावेळी केला.
आम्हाला राजकारण करायचं नाही. जर सरकारने मराठा आरक्षण अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही तर राज्यात 288 विधानसभेत उमेदवार उभे करणार असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
मी माझ्या निर्णयावर ठाम असून मला उपोषणाला परवानगी प्रशासनाने नाही तर सरकारने नाकारली असल्याचं जरांगे म्हणाले. जातीय तेढ या शब्दात मला द्वेष दिसत असल्याचं म्हणत महाराष्ट्रातील मराठा समाजाने शांत रहावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. सरकारने सगे सोयरे कायद्याचा अध्यादेश काढलेला आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे उपोषण असल्याचं जरांगे म्हणाले. हे आंदोलन सरकार ला मोडीत काढायाच आहे असा आरोप ही जरांगे यांनी यावेळी केला. आम्हाला राजकारण करायचं नाहीये पण जर सरकारने मराठा आरक्षण अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही तर राज्यात 288 विधानसभेत उमेदवार उभे करावेच लागतील असा इशारा ही जरांगे यांनी दिला.
ML/ ML/ SL
8 June 2024