कृषि विज्ञान केंदाच्यावतीने भरविण्यात आला आंबा महोत्सव…
बुलडाणा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांना आपल्या शेतात आंबा लागवडीला वाव मिळावा तसेच आंब्याच्या प्रजातींना ओळख मिळावी, या उद्देशाने हा आंबा महोत्सव आणि प्रदर्शनीचे आयोजन बुलडाणा येथे करण्यात आले होते. या आंबा महोत्सवाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठचे कुलगुरू डॉ शरद गडाख यांच्या हस्ते झाले .
बुलडाणा येथील कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील शेतकरी तसेच आंबा प्रेमींसाठी एकदिवसीय “आंबा महोत्सव,आंबा प्रदर्शनी व विक्री चे आयोजन काल करण्यात आलं होतं .या महोत्सवामध्ये केशर,पायरी,लंगडा,निलंम,राजपुरी,मल्लिका,रत्ना, तोतापुरी, हापूस,दसेरी,आम्रपाली व गावरान यासह अन्य प्रजातीचे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
प्रदर्शनीमध्ये उपस्थित झालेल्या शेतकऱ्यांना विविध प्रजातीच्या आंब्याची माहिती आंबा लागवड त्याची घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन पंजाबराव देशमुख यांच्या तंज्ञांनी केलं. या महोत्सवात अनेकांनी त्यांच्या पसंतीचे आंबे देखील खरेदी केले,या आंबा महोत्सवाध्ये शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
ML/KA/SL
3 June 2023