खाद्यतेलाच्या किमतीमध्ये तत्काळ कपात करण्याचे निर्देश

 खाद्यतेलाच्या किमतीमध्ये तत्काळ कपात करण्याचे निर्देश

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला आता खाद्यतेलाच्या किमती कमी होणार असण्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने जागतिक बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या किमती घसरल्याच्या अनुषंगाने देशातील प्रमुख खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) प्रति लिटर ८ ते १२ रुपयांनी कपात करावी,असे निर्देश दिले.अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी तेल उत्पादकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली असून तेल उत्पादकांनी दरात कपात करण्याचे मान्य केले आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती सतत घसरत आहेत आणि म्हणूनच देशांतर्गत बाजारातील किंमती देखील प्रमाणात कमी होतील, हे खाद्यतेल उद्योगाने सुनिश्चित करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत जागतिक बाजारातील किमतीतील कपात ग्राहकांना त्वरीत पोहोचवण्यासाठी कंपन्यांना सांगण्यात आले आहेत.

दरम्यान,अन्न सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर अन्न मंत्रालयाने सांगितले की, “ज्या कंपन्यांनी त्यांच्या किमती कमी केल्या नाहीत आणि ज्यांची MRP इतर ब्रँडपेक्षा जास्त आहे, त्यांनाही त्यांच्या किमती कमी करण्याचा निर्देश देण्यात आला आहे.”

उत्पादक आणि रिफायनर्सने वितरकांना ऑफर केलेली किंमत देखील तात्काळ प्रभावाने कमी करणे आवश्यक आहे, जेणेकरून कपातीचा परिणाम दिसून येईल. याशिवाय जेव्हा-जेव्हा उत्पादक/रिफायनर्स वितरकांना किंमत कमी करतात, तेव्हा तोच फायदा ग्राहकांना दिला जावा आणि मंत्रालयाला देखील नियमितपणे सूचित केले जावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

मंत्रालयानुसार खाद्यतेलाच्या किमतीतील घसरणीचा कल कायम असून खाद्यतेल उद्योग आणखी कपातीची तयारी करत आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, “घरगुती ग्राहक ते खरेदी केलेल्या खाद्यतेलासाठी कमी किंमत देण्याची अपेक्षा करू शकतात. खाद्यतेलाच्या किमती घसरल्याने महागाई कमी होण्यास मदत होईल.’’

SL/KA/SL
3 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *