परळीत महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची मांदियाळी
बीड, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील प्रभू वैजनाथ मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी रात्री बारा वाजल्यापासून मोठी गर्दी केली होती. तब्बल पाच लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज वैजनाथ मंदिर ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.Mandiyali of devotees on the occasion of Mahashivratri in Parlit
प्रभू वैजनाथाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यासह परराज्यातून भाविक मोठया संख्येने येतात. यावर्षी स्त्री आणि पुरुषांसाठी दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ML/KA/PGB
18 Feb. 2023