पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

 पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील आठवड्यात पंतप्रधान मोदींना धमकीचे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी आज अटक केली आहे. झेवियर असे या व्यक्तीचे नाव आहे. झेवियरने केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते – मोदींची अवस्था राजीव गांधींसारखी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत.

कोचीचे पोलिस आयुक्त सेतू रमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांना धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वैयक्तिक वैमनस्यातून शेजाऱ्याला अडकवण्यासाठी झेवियरने हे पत्र लिहिले होते.

झेवियरने पत्रावर एनजे जॉनी म्हणून स्वाक्षरी केली आणि खाली फोन नंबर लिहिला होता. पोलिसांनी जॉनीची चौकशी केली असता, त्याला पत्राबाबत काहीही माहिती नाही, पण शेजारी झेवियरशी भांडण झाल्याचे त्याने मान्य केले. एर्नाकुलममधील कथरीकाडावू येथील रहिवासी असलेल्या झेवियरला पोलिसांनी त्याच्या हस्ताक्षराची पडताळणी केल्यानंतर अटक केली.

केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान 25 एप्रिल रोजी तिरुअनंतपुरम ते कासारगोड दरम्यान केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, पठानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड या 11 जिल्ह्यांना जोडेल. याशिवाय पंतप्रधान तिरुअनंतपुरममध्ये डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी करतील.

SL/KA/SL

23 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *