गुड न्यूज! महाराष्ट्रात पालघर, मालवणजवळ सापडले भलेमोठे खनिज तेलसाठे

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अरबी समुद्रात सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि पालघर (Palghar) जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडले आहेत. पालघरमधील डहाणूच्या समुद्रात 5338 आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात 13 हजार 131 चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. अरबी समुद्रात 8 वर्षांपासून हे संशोधन सुरू होते. या तेल साठ्यामुळे भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता आहे. या नवीन साठयामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे.
ML/ML/PGB 13 Jan 2025