DGCA ची मोठी कारवाई, Go First च्या सर्व विमानांची नोंदणी रद्द

 DGCA ची मोठी कारवाई, Go First च्या सर्व विमानांची नोंदणी रद्द

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विमान वाहतूक उद्योगाचे नियमन करणारी संस्था DGCAने दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात असलेल्या Go First या एअरलाइनने भाडेतत्त्वावर घेतलेल्या सर्व 54 विमानांची नोंदणी रद्द केली आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने विमान भाड्याने देणाऱ्या कंपन्यांना गो फर्स्टमधून त्यांची विमाने मागे घेण्याची परवानगी दिली होती. एव्हिएशन रेग्युलेटरद्वारे नोंदणी रद्द करणे म्हणजे विमान यापुढे एअरलाइनकडे उड्डाण सेवांसाठी नोंदणीकृत नाही. जर एअरलाइनने विहित अटींनुसार कामगिरी केली नाही तर पुरवठादाराकडे विमानाची नोंदणी रद्द करण्याचा पर्याय आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये Go First ने आर्थिक संकटाचा सामना केल्यानंतर उड्डाणे बंद केली होती आणि दिवाळखोरी प्रक्रियेत जाण्याची घोषणा केली होती. सध्या त्याच्यावर दिवाळखोरीची कारवाई सुरू आहे. विमान कंपनीचे कामकाज बंद झाल्यानंतर, विमान पुरवठादार कंपन्यांनी गो फर्स्टमधून त्यांची विमाने परत घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. प्रदीर्घ कायदेशीर कारवाईनंतर पुरवठादारांना दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर DGCA ने बुधवारी गो फर्स्ट एअरलाइनसह भाड्याने घेतलेल्या सर्व 54 विमानांची नोंदणी रद्द केली.

DGCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोंदणी रद्द करण्यासंबंधी काही नोटिसा नियामकाच्या वेबसाइटवर टाकण्यात आल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने 26 एप्रिल रोजी दिलेल्या निकालात DGCA ला 54 भाडेतत्त्वावरील विमाने परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते. हे कामही पाच दिवसांत पूर्ण करण्यास सांगितले होते.

SL/ML/SL

2 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *