राष्ट्रीय महिला आयोगाकडून महिला कैद्यांच्या स्थितीची तपासणी

 राष्ट्रीय महिला आयोगाकडून महिला कैद्यांच्या स्थितीची तपासणी

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात महिला कैद्यांची काय स्थिती आहे, त्यांच्यासोबत कसा व्यवहार केला जातो, हे तपासण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या जॉईंट सेक्रेटरी ए. अशोली चलाई यांनी अचानक नागपूर कारागृहात भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. या भेटीत चलाई यांनी महिला कैद्यांची स्थितीही जाणून घेतली.

राज्यात मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणाने प्रचंड खळबळ उडवून दिली होती. यानंतर देशातील अनेक कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महिला कैद्याची प्रकृती बिघडल्यास त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळत नाही. त्यांना साधे प्राथमिक उपचार तात्काळ मिळणेही कठीण असून, त्या मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याची जोरदार ओरड झाली होती. काही दिवसांनी महिला कैद्यांचे हक्क डावलले जात असल्याचा एक अहवालच पुढे आला होता. या संबंधाने सर्वत्र चर्चा सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात बंदिस्त असलेली एक युवती लैंगिक शोषणाचा बळी ठरल्याचे उघड झाले होते. शिवाय छत्तीसगडमधील कारागृहात महिला कैद्यांचे कपडे उतरवून त्यांच्यासोबत अमानविय अत्याचार केला जात असल्याचेही पुढे आल्याने देशभर खळबळ उडाली होती. त्यामुळे या आणि अशाच अनेक प्रकारांची गंभीर दखल घेत महिला आयोगाने तुरुंगातील महिला कैद्यांच्या (विदारक) स्थितीचा आढावा घेणे सुरू केेले.

ML/KA/PGB 11 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *