खेळाडू कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी लवकरच

 खेळाडू कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी लवकरच

पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र राज्य पोलीस दलामार्फत ७१ वी अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेला पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या वानवडी इथल्या मैदानावर सुरुवात झाली.या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या उपस्थितीत करण्यात आलं, पुढील वर्षी यासाठी पोलीस अकॅडमी स्थापन करण्यात येईल असं ते म्हणाले .Maharashtra Police Academy for training of sportspersons soon

१६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत.यावेळी विविध संघाने मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर कुस्तीपटू राहुल आवारे राहुल आवारे आणि मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेची ज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात या स्पर्धेमुळे पोलीस दलातील खेळाडूंचे मनोबल वाढणार आहे.

अशा स्पर्धेमधून ऑलिंपिक स्पर्धे करता नवीन खेळाडू तयार आणि देशाला ऑलम्पिक मध्ये पदक मिळवून देतील असा विश्वास पोलीस महासंचालक यांनी यावेळी व्यक्त केला .Maharashtra Police Academy for training of sportspersons soon या स्पर्धेमध्ये कुस्ती, कबड्डी, मुष्ठी युद्ध, पंजा कुस्ती, पॉवरलिफ्टींग, भारतोलन, शरीरसौष्ठव अशा विविध सात क्रीडा प्रकारांचा समावेश असेल.

या स्पर्धा महिला व पुरुष या दोन्ही गटासाठी असून यामध्ये २७ राज्ये , ०५ केंद्रीय सशस्त्र पोलीस विभागांचे संघ , ०५ केंद्रशासित प्रदेशांचे संघ असे एकूण ३७ संघ सहभागी होणार आहेत. एकूण १५९६ पुरुष खेळाडू व ६३२ महिला खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक, सहाय्यक ४११ असे एकूण २६३९ स्पर्धक उपस्थित राहणार आहेत.

 

ML/KA/PGB
16 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *