Maharashtra Monsoon: वरुणराजा रुसला बळीराजा चिंतेत, मान्सून लांबणीवर गेल्याने पेरण्या खोळंबल्या
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण जून महिन्यात राज्यातील बहुतांश भाग (Maharashtra Rain Update) कोरडेच राहिले. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस सुरू आहे. मात्र, जूनमध्ये अपेक्षेइतका पाऊस झाला नाही. विदर्भात कमी पावसाची नोंद झाल्याने शेतीला मोठा फटका बसलाय…
जून महिन्यात एकूण सरासरीपेक्षा 50 टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात हा आकडा आणखी कमी आहे. कारण राज्यात सर्वात कमी पाऊस विदर्भात झाला आहे. राज्यातील परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यात पावसाने जूनची सरासरी ओलांडली आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरी 32 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
संपूर्ण देशात आतापर्यंत जूनच्या सरासरीपेक्षा १० टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सरासरीच्या 50 टक्के पाऊस झाल्याचा अंदाज आहे. सर्वात कमी पावसाची नोंद विदर्भात झाली आहे. मराठवाड्याने जूनची सरासरी ओलांडली आहे.
मान्सून दाखल झाला असला तरी पावसाची प्रतिक्षा थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे पेरणीसाठी अपेक्षित पाऊस झालेला नाही. खरीप हंगाम महत्त्वाचा असताना अनियमित पावसामुळे पेरणी करायची की नाही, या संभ्रमात राज्यातील शेतकरी आहेत. पावसाअभावी अनेक ठिकाणी शेती ठप्प झाली आहे. धरणांतील पाणीसाठा संपल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. तसेच भारतीय हवामान खात्याने यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता.
HSR/KA/HSR/ 28 June 2022