नाथवंशाचा वारकरी भूषण पुरस्कार महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांना

छ संभाजीनगर दि २२…. दक्षिण काशी श्रीक्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराज संस्थांचा मानाचा वारकरी भूषण पुरस्कार बीडच्या महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांना प्रदान करण्यात आला. नाथ षष्ठीच्या औचित्याने हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.. शांतिब्रह्म श्रीएकनाथ महाराज मिशन पैठण, संचलित श्री एकनाथ संस्थानाधिपती
वै.ह.भ.प. भैय्यासाहेब महाराज पैठणकर वारकरी भुषण पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतो..
यावर्षी संत बंकट स्वामी महाराज संस्थानचे मठाधिपतीह.भ.प.श्री. महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांना तो प्रदान करण्यात आला. यावेळी ह भ प योगीराज महाराज गोसावी , ह भ प शिवाजी महाराज नारायणगड , ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, अक्षय महाराज भोसले, तुषार महाराज भोसले, कृष्णा महाराज भगवानगड, राम महाराज झिंजुर्के, अमृत महाराज जोशी, संजय नाना धोंडगे यांच्यासह हजारो भाविक भक्त उपस्थित होते.