अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण…

जळगाव दि २२– जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे ३० आणि ३१ मार्च २०२५ रोजी अहिराणी साहित्य परिषदेतर्फे होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी, अमळनेर येथील अहिराणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डी . डी . पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील, समन्वयक रणजित शिंदे, कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे, डी . ए. पाटील , सुनील पाटील तसेच प्रा. डॉ. सत्यजित साळवे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते. अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ते पाचवे अहिरानी साहित्य संमेलन होणार असून या निमित्ताने आर्टिस्ट किरण बागुल यांनी तयार केलेल्या या संमेलन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.