महालक्ष्मी मंदिरात झोपाळ्यावरची विशेष पूजा

 महालक्ष्मी मंदिरात झोपाळ्यावरची विशेष पूजा

कोल्हापूर , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबाबाईची झोपाळ्यावरील पूजा बांधण्यात आली होती. नक्षीदार चांदीनं मढविलेले लाकडी सिंहासन दोऱ्या बांधून तख्तपोशीलाझोपाळ्यासारखे बांधले होते. त्या झोपाळ्यावर महालक्ष्मी अंबाबाईची उत्सव मूर्ती विराजमान झाली.यानंतर हवालदारांच्या खास ठेवणीतले दागिनेआणि भरजरी साडीनं देवीची पूजा बांधण्यातआली.सुहासिनीं (महिलां) कडून देवीला हळदी-कुंकूलावल्यानंतरसनई-ताशाच्या निनादातचोपदारांकडून उत्सवमूर्तीच्या झोपाळ्याला झोके देण्यात आले. यानंतर कैरीची डाळ आणि पन्हेयांचा प्रसाद भाविकांना देण्यात आला. हाल सोहळा रात्री आठपर्यंत सुरू होता.देवीची पूजा मयूर मुनिश्वर, सुकृत मुनिश्वर, सोहम मुनिश्वर, सचिन गोटखिंडीकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.हा सोहळा भाविकांना अनुभवता यावा यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने थेट प्रक्षेपण करण्यात आलं.तसंच भक्तांना गरुड मंडपातील हा सोहळा आणि महालक्ष्मी अंबाबाई ची मूर्ती दर्शनाचाही लाभ भाविकांना थेट मिळावा यासाठी मंदिर परिसरात टीव्ही बसवण्यात आले होते.

ML/KA/PGB 23 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *