हिंगोलीत पकडलेली मगर ईरई डॅमच्या पाण्यात झाली निसर्गमुक्त
चंद्रपूर दि २६ :– हिंगोली येथून रेस्क्यू करून आणलेल्या मगरीला चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा–आंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या इरई धरण परिसरात निसर्गमुक्त करण्यात आले. या मगरीची लांबी तब्बल ८ फूट होती. ही मगर हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरण परिसरातील उसाच्या शेतात आढळून आली होती. मानवी वस्तीजवळ मगर आल्याने संभाव्य धोका लक्षात घेता, वन विभागाने तातडीने कारवाई करत दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी त्या मगराला सुरक्षितरित्या पकडले. या यशस्वी रेस्क्यूमुळे एकीकडे मानव–वन्यजीव संघर्ष टळला, तर दुसरीकडे वन्यजीव संरक्षणाबाबत वन विभागाची तत्परता, समन्वय आणि संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे.ML/ML/MS