माधुरी दिक्षितला मिळाला इफ्फीत विशेष पुरस्कार

पणजी, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धकधक गर्ल माधुरी दिक्षितला गोव्यात सुरु असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष मान्यता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग सिंह ठाकूर यांच्यासह माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज पणजी, गोवा येथे झालेल्या ५४ व्या इफ्फीच्या उद्घाटन समारंभात या पुरस्काराची घोषणा केली.
1980, 90 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या हिंदी चित्रपटांमधील मुख्य अभिनेत्री म्हणून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरी दीक्षितला सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आणि तिला विक्रमी चौदा वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. माधुरीने ‘अबोध’ (1984) मधून चित्रपटात पदार्पण केले आणि ‘तेजाब’ (1988) द्वारे तिला व्यापक लोकमान्यता मिळाली. 2014 मध्ये तिची भारतातील युनिसेफ सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
SL/KA/SL
20 Nov. 2023