परिवहन खात्याच्या सेवानिवृत्तांनी पूरग्रस्तांना दिली दीड लाखाची मदत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे धनादेश केला सुपूर्द.
मुंबई, दि ४
महाराष्ट्रातील शेतकरी आणि स्थानिक नागरिक यांचे अतिवृष्टीमुळे अपरिमित नुकसान झाले आहे. ते भरून काढता येणे शक्य नाही पण एक सामाजिक जाणीवेतून कर्तव्य भावनेने मोटार वाहन विभाग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या आव्हानाला प्रतिसाद देत दीड लाखाचा धनादेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मंत्रालय येथे जाऊन सुपूर्द केला.
हा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला जाईल.
महाराष्ट्रात आलेल्या या ओला दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढता येणार नाही. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे दप्तरे पुस्तके वाया तसेच शालोपयोगी वस्तूंची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना यातून थोडासा दिलासा मिळावा यासाठी आमचा छोटासा प्रयत्न असून यापुढे देखील आम्ही असेच प्रकारे पुढे प्रश्न मदत करणार असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी शेखर छत्रे यांनी दिली. यावेळी संघटनेचे सचिव दत्ता पवार, हरेश पाटील, जितेंद्र मंडलिया आणि उत्तम आवळे उपस्थित होते. यावेळी संघटनेचे हितचिंतक गणेश कोचरेकर यांनी या कामासाठी अमूल्य असे सहकार्य केले.KK/ML/MS