विरोधकांच्या अनुपस्थितीत लोकायुक्त विधेयक मंजूर
नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेत आज विरोधकांच्या अनुपस्थितीत मंजूर करण्यात आले. संपूर्ण मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांना लोकायुक्ताच्या कक्षेत आणणारे हे विधेयक आहे.
असे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, आण्णा हजारे यांना अपेक्षित असणारा हा कायदा तयार करण्यात आला आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्यांनी सांगितलेले बदल मान्य करण्यात आले आहेत असेही ते म्हणाले.
१९७७ चा जुना लोकायुक्त कायदा आता बदलला असून त्यात नसलेल्या बाबी यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, जुन्या कायद्यात लोकायुक्त यांना मंत्र्यांवर कारवाईचे अधिकार नव्हते ,ते आता देण्यात आले आहेत, चुकीच्या तक्रारी रोखण्याची ही तरतूद त्यात आहे . केंद्रीय कायद्यात असलेल्या तरतुदी यात आहेत , उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश लोकायुक्त असतील त्यांना आणखी एक असे एकूण दोघांचे ते पीठ असेल असे फडणवीस यांनी सांगितले.
यानंतर विरोधक सभागृहात असेल , हे विधेयक घाईने का मंजूर करण्यात आले असा सवाल भास्कर जाधव यांनी सभागृहात केला.
ML/KA/SL
28 Dec. 2022