बंद दरवाज्याच्या लोकलची प्रवासी ट्रायल दोन तीन आठवड्यात

 बंद दरवाज्याच्या लोकलची प्रवासी ट्रायल दोन तीन आठवड्यात

मुंबई दि १६ : मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेमध्ये लवकरच दरवाजे बंद होणारी साधी लोकल धावणार आहे.
ही लोकल मुंबईत कुर्ला कारशेड मध्ये दाखल झाली आहे. आज माध्यम प्रतिनिधीना या लोकलची पाहाणी करता यावी म्हणून रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने व्यवस्था केली होती.

या वेळी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वपनील नीला यांनी या लोकल बाबत माहिती दिली.
ते म्हणाले या लोकलची कन्सेप्ट डिसेंबर मध्ये पूर्ण केली गेली होती. तीन महिन्याच्या कालावधीमध्ये कार्यवाही पूर्ण करून ही लोकल तयार केली गेली आहे.
या लोकलमध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी देण्यात आल्या आहेत. एक स्वयंचलित दरवाजे बंद होणारी सिस्टम यात आहे.
ज्यामुळे स्टेशनवर होणाऱ्या दुर्घटना, किंवा दोन्ही स्टेशनच्या मध्ये प्रवासी पडून होणाऱ्या दुर्घटना पूर्णपणे बंद होतील अशी आशा आहे.

दरवाजामध्ये लोवर्सची व्यवस्था करण्यात आली आहे . बेस्ट बुल ची अरेंजमेंट करण्यात आली आहे त्यामुळे गर्दीचे विभाजन होईल करता येईल. रूफ माउंटेन व्हेंटीलेशन सिस्टम यात बसवण्यात आली आहे. त्यामुळे प्रति तास दहा हजार क्युबिक मीटर इतकी हवा ट्रेनच्या कोच मध्ये आपणास पोचवू शकतो त्यामुळे बाहेरील ऑक्सिजन आणि ट्रेनमधील ऑक्सिजनचे प्रमाण सारखे राहील.

ही ट्रेन एसी लोकलच्या धर्तीवर बनवण्यात आली आहे अशीही माहिती डॉ. नीला दिली. या गाडीमध्ये फायर डिटेक्शन सिस्टम प्रत्येक कोचच्या एंड पॅनलवर लावण्यात आले आहेत, त्यामुळे आगीच्या दुर्घटना होणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली आहे. खिडक्यांची रुंदी वाढवण्यात आली आहे. एक हजार नऊशे सेंटीमीटर एवढ्या मोठ्या खिडक्या करण्यात आल्या आहेत आणि या खिडक्या दोन तृतीयांश उघडणार आहेत. त्यामुळे हवा खेळती राहील. सध्या ट्रेनच्या आर डी एस ओ ट्रायल सुरू आहेत. त्यानंतर प्रवासी चाचण्या दोन ते तीन आठवड्यात होतील. त्यानंतर या लोकल उपनगरीय सेवेमध्ये दाखल होण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती स्वप्नील नीला यांनी दिली.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *