रोवणी करताना वीज पडली, दोन महिला मजुरांचा मृत्यू

रोवणी करताना वीज पडली, दोन महिला मजुरांचा मृत्यू
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रोवणी करण्यासाठी शेतावर गेलेल्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव शेतशिवारात सोमवारी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली. जखमी महिलांवर मोहाडीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान दुपारी ढगांचा गडगडाट होऊन वीज पडली. यात आशा सुरेश सोनटक्के आणि कला तुकाजी गोखले या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. त्या आंधळगाव येथील रहिवासी आहेत. तर, रुखमा बंडू निमजे, मैना पतीराम सेलोकर (दोघीही रा. आंधळगाव) आणि वंदना मधुकर जीभकाटे, निशा जीभकाटे (रा. डोंगरगाव) या चार महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांवर मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Lightning struck while planting, two women laborers killed
ML/ML/PGB
17 July 2024