गुगल मॅपचा नाद जीवावर बेतला, पुलावरून कार कोसळून तिघांचा मृत्यू
गुगल मॅपवर विश्वास ठेऊन आपण आपल्याला हवा तो रस्ता शोधत असतो. काही वेळा ठिकाण जवळ असून मॅपमुळे तुम्हाला लांबच्या रस्त्याने जावं लागू शकतं. अशावेळी वैताग येतो. पण या गुगल मॅपमुळे काही जणांना जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये लग्नाच्या सोहळ्याला जात असलेल्या तिघा मित्रांचा एका विचित्र कार अपघातात मृत्यू झाला आहे. यांच्या कुटुंबियांनी हा अपघात गुगल मॅपमुळे झाला असल्याचा दावा केला आहे. कारण, हे मित्र गुगल मॅपचा वापर करुन कार चालवत होते.