Lemon prices: तेलाच्या किमती वाढल्याने लिंबूही झाला महाग

 Lemon prices: तेलाच्या किमती वाढल्याने लिंबूही झाला महाग

नवी दिल्ली, दि. 12  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीसह देशाच्या इतर भागात भाज्यांचे भाव झपाट्याने वाढले आहेत. या सगळ्यात लिंबाच्या दराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लिंबाचा भाव 350 ते 400 रुपये किलो झाला आहे. पेट्रोल, डिझेल (Petrol, Diesel)आणि सीएनजीच्या(CNG) किमतीत वाढ झाल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली असून, हा भाजीपाल्यांच्या किमती वाढण्यामागचा प्रमुख घटक असल्याचे मानले जात आहे. मात्र, लिंबाच्या बाबतीत व्यापारी भाव वाढण्यामागे उत्पादन कारणीभूत असल्याचे सांगत आहेत. गुजरातमधील चक्रीवादळाच्या आफ्टर इफेक्टमुळे असे अनेक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.Lemon prices: Lemon has become costlier due to rise in oil prices

लिंबू पाणी हे उन्हाळ्यात खूप गरजेचे असते, कारण ते तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास आणि उष्णतेशी लढण्यास मदत करते. मात्र बाजारात ३५० ते ४०० रुपये किलोने लिंबू विकला जात आहे, याचा अर्थ १० रुपयाला पण एकही लिंबू मिळणार नाही.

सध्याच्या उन्हाळी हंगामात कमी पुरवठा आणि जास्त मागणी यामुळे लिंबाच्या किमतीत वाढ झाली आहे.

नोएडातील भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, इंधनाचे दर वाढल्यामुळे भाजी मंडईत जास्त किमतीत भाज्या मिळत आहेत. तसेच चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ (Increase in gas prices)झाल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली असून, भाज्यांचे भाव सातव्या गगनाला भिडले आहेत.

HSR/KA/HSR/12 April  2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *