आळशी छोले

 आळशी छोले

आळशी छोले

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उकडलेले चणे काढून चण्यांचं पाणी राखून ठेवावं. नको असेल तर खडा मसाला काढून घ्यावा. लोखंडी कढईत निथळलेले चणे, छोले मसाला, आल्याचा कीस, मिरच्या आणि मीठ असं सगळं नीट मिसळून अर्धा तास झाकून ठेवावं.

अर्धा तास होत आल्यावर, एका सॉसपॅन मधे पाऊण वाटी तेल अगदी मंद आचेवर तापायला ठेवावं आणि बटाटे सोलून एकाचे ८ भाग असे चिरून, धूवून, निथळून घ्यावेत. तेल तापल्यावर बटाटे तळून चांगले तपकीरी रंगावर काढावेत. यावर ब्याडगी मिरची पावडर, छोले मसाला आणि मीठ घालून बटाटे चांगले मिसळून घ्यावेत.

तापलेलं तेल डावेनी चण्यांवर थोड घालावं आणि चणे मिसळावेत. असं जरा जरा तेल घालत जावं आणि छोले पूर्ण ओलसर झाले तेलानी की तेल घालणं बंद करावं
आता कढईखाली गॅस सुरू करावा आणि मसाले वाले चणे चांगले परतावेत. ५/७ मिनिटं मोठ्याच आचेवर तळसून झाले की २ डाव चणे शिजवलेलं पाणी त्यात घालावं अन परतणं पुढे चालू ठेवावं. असं लागेल तसं पाणी घालून लटपटी ग्रेव्ही तयार होऊ द्यावी.

नंतर अगदी मंद आचेवर १० मिनिटं ठेवून मग जरा कोथिंबीर घालून सजवावं. टिपिकल काळसर रंगाचे आणि सुरेख चवीचे छोले होतात.
वरून अजून हवं असेल तर आलं घालावं; वर तयार केलेले बटाटे घालावेत. सलाद घ्यावं आणि सोबत भटुरे, चपाती, भात असं काहीही चांगलच लागतं.

Lazy chickpeas

ML/ML/PGB
7 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *