लक्ष्मी बिल्डिंग गणेशोत्सव हीरक महोत्सव जल्लोषात

मुंबई, दि ३१
लक्ष्मी बिल्डिंग रहिवासी मंडळ भायखळा या मंडळाचे यंदाचे हिरक महोत्सवी वर्ष गणेशोत्सव सोहळा साजरा करीत आहे. या प्रसंगी मंडळाने भव्य अशी नेत्रदीपक सजावट, विद्युत रोषणाई आणि आरस केली असून श्री गणरायाची सुबक, मनमोहक, आकर्षक मूर्ती सुंदर अशा महाला मध्ये विराजमान करण्यात आली आहे. या कालावधीत मंडळाच्या वतीने विविध सामाजिक , शैक्षणिक, धार्मिक व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. श्री गणरायाच्या दर्शना साठी गणेश भक्त आवर्जून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत. तरी सर्व गणेश भक्तांनी आमच्या मंडळाला भेट द्यावी असे आवाहन मंडळाचे
सेक्रेटरी गणेश इथापे यांनी केले आहे.KK/ML/MS