२५ ऑक्टोबर रोजी या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण. काय होतील जगावर परिणाम

 २५ ऑक्टोबर रोजी या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण. काय होतील जगावर परिणाम

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अश्विन महिन्यातील अमावास्येला मंगळवारी दिनांक २५  ऑक्टोबर २०२२ रोजी या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण(Solar Eclipse) होणार आहे. ग्रहण दुपारी ०२ वाजून २९  मिनिटांनी सुरु होणार असून संध्याकाळी०६वाजून ३२ मिनिटाला संपेल. ह्या ग्रहणाचा प्रभाव हा तूळ  राशीवर आणि स्वाती नक्षत्रावर जास्त असेल.  हे सूर्यग्रहण ४ तास ३ मिनिटे चालणार आहे.हे ग्रहण भारतासह पश्चिम आशिया(Western Asia),अमेरिका(America) ,Middle East तसेच युरोप(Europe),आफ्रिका  या ठिकाणाहून दिसेल. ग्रहणाचे परिणाम हे दीर्घकालीन  असतात. Usually The Eclipse leave its after effects for long duration.

जाणून घेऊया या ग्रहणाचे परिणाम – Impact of Eclipse

संपूर्ण जगात व देशात येणाऱ्या काळात अशांतता,असंतोष, व अस्वस्थता निर्माण होईल.

जगात व देशात या काळात अग्निपलयाच्या घटना घडतील,भूकंपाचे धक्के जाणवतील. देशाच्या काही बाबतीत,घडामोडीत अडथळे निर्माण होतील.देशाच्या तिजोरीत/उत्पनात घट होईल. जगातील देशांची आर्थिक स्थिती बिघडणार. देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होईल. देशात खर्चाचे प्रमाण वाढेल. देशाची अंतर्गत स्थिती बिघडण्याची शक्यता. सीमेवर तणाव वाढेल .बेरोजगारीत वाढ होईल.

सरकारसाठी (सत्ताधारी )त्रासदायक.

सत्ताधारी व विरोधक यांच्यातील मतभेद वाढत जातील. विधानसभा/विधानपरिषद,लोकसभा/राज्यसभा  या ठिकाणी  चर्चेत खंड /व्यत्यय,तसेच विरोधी पक्षांचा सभात्याग (walkout)काही सदस्यांवर कायदेशीर कारवाईची शक्यता. काही ठिकाणी सत्ताधारी पक्षात फूट पडणार किंवा सरकार अल्प मतात  येणार. पक्षाचे विभाजन,संसदेत सरकारसाठी प्रतिकूल, मंत्राचे परिवर्तन,संसद सदस्यांचे मृत्यू होण्याची शक्यता. सरकार संकटाच्या घेऱ्यात अडकेल.मंत्रिमंडळातील सदस्याच्या मृत्यूची शक्यता.सरकार पडेल अशी स्थिती निर्माण  होते. गरिबांच्या कल्याणाकरिता/साहाय्याकरिता ठ्वलेल्या पैशाचा दुरुपयोग होण्याची शक्यता. पक्षात फूट,मंत्रिमंडळात फेर बदल,संसद सदस्यांच्या तब्येतीत बिघाड होण्याची शक्यता.       

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश व पेन्शनर लोकांना प्रतिकूल. धनवान,प्रसिद्ध व्यक्तिना त्रासदायक मृत्यूची शक्यता.,लहान मुले,स्त्रिया,स्त्री कलाकार, प्रसिद्ध महिला, संगीतकार,अभिनेता यांच्यासाठी विपरीत अपघात/मृत्यूची शक्यता. नृत्यांगना,गायिका,फॅशन डिझायनर,रेडिओ,दूरदर्शन कलाकारांना प्रतिकूल. सुप्रसिद्ध /प्रतिष्ठित व्यक्तीची हिंसक घटनेत मृत्यू होण्याची शक्यता तसेच सन्मानित व्यक्तीचा अचानकपणे  मृत्यू. दुर्घटना,विस्फोट,आत्महत्या,रहस्यमयी रित्या अचानक मरण असे प्रकार घडताना दिसतील. अधिकारी वर्गास त्रास दायक. खून,दरोडे, माऱ्यामाऱ्या अश्या घटना वाढ होईल.

आग,अपघात,रोग  यांचे प्रमाण वाढेल. काही रोगांचे  (संसर्गजन्य) प्रादुर्भाव वाढतील, नाट्य गृहे व करमणुकीचे साधने यांना काही काळ प्रतिकूल. आग,अपघात यांचे प्रमाण वाढेल. जंगलांना/सरकारी कार्यालयांना  आग लागण्याची शक्यता. चेंगराचेंगरी, होऊन/ आगी लागून मृत्यू होण्याची शक्यता.

काही ठिकाणी विजेची टंचाई निर्माण होईल,बांधकाम क्षेत्रात अडथळे निर्माण होतील.

शिक्षण अथवा धार्मिक सुधारणेच्या संबंधी काही ठराव केले जातील.

घटस्फोटाची प्रकरणे वाढतीलस्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रकरणांनी खळबळ माजेल.

वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढेल.

काही बँक/पतसंस्था अडचणीत  येण्याची शक्यता. चलनात बदल होणार नवीन चलन वापरात येणार. काही संस्थांच्या विश्वस्थ किंवा संचालकांना तुरुंगवास होण्याची शक्यता.काही वित्तीय संस्थांवर बंदी येण्याची शक्यता.वित्तीय घोटाळ्यांचा पर्दाफाश होईल.

शेअरमार्केट वर ह्या ग्रहणाचा प्रतिकूल परिणाम होणार

गुंतवणूकदारानी सावधानतेने पाऊले टाकावीत.शेअर मार्केट व करन्सी मार्केट करिता प्रतिकूल असल्याने,मोठया घसरणीची/चढ उताराची  शक्यता. Last solar eclipse of this year on 25 October. What will be the effect on the world

जितेश सावंत

के. पी. विशारद , नक्षत्र सम्राट

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
21 DEC. 2022

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *