सरकार नक्षलवादाचे समर्थन करू शकत नाही
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): न्यायालयाने दहा वर्षे तुरुंगात टाकलेल्या आणि शहरी नक्षलवादी चळवळीचा शिरोमणी असणाऱ्या व्यक्तीच्या पुस्तकाला पुरस्कार देऊन शासन त्या चळवळीचे समर्थन करू शकत नाही असे स्पष्ट मत मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.
कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार सरकारने रद्द केल्यावर उठलेल्या वादावर केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.Language Minister Deepak Kesarkar
सरकारचा कोणत्याही साहित्य कृतीवर आक्षेप नाही, साहित्य विश्वात आम्ही कोणताही हस्तक्षेप केलेला नाही, मी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा शी बोललो आणि हा पुरस्कार वादग्रस्त असताना सरकारशी चर्चा का केली नाही अशी विचारणा केली होती असे केसरकर म्हणाले. यावर साहित्यिक नाराज होतील म्हणून बोललो नाही असे उत्तर अधक्ष सदानंद मोरे यांनी दिल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
शहरी नक्षलवाद फोफावत आहे दुसरीकडे नक्षल चळवळीवर देशात बंदी घातली आहे, अशा स्थितीत अशावर आधारित पुस्तकावर शासन आपली पुरस्काराची मोहोर कशी उमटवू शकते असा सवाल त्यांनी केला. अजित पवारांनी या विषयाची तुलना आणीबाणी शी केली ती चुकीची आहे असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.
ML/KA/PGB
14 Dec .2022