संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत

पुणे, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. माउलींचा ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा आज संपन्न होत आहे. तर, रविवारी सोहळ्याची सांगता होणार आहे.
पहाटे श्रींना पवमान अभिषेक ,दुधारती करण्यात आली. वीणा मंडप, भोजलिंगकाका मंडप, हैबतरावबाबा पायरीपुढे कीर्तन सेवा होणार असून. सकाळी दहा वाजता नामदास महाराज यांचे कीर्तन होणार आहे. महाद्वारात काल्याचे कीर्तन झाल्यानंतर श्रीगुरू हैबतरावबाबा यांच्या दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होईल. दुपारी बाराच्या सुमारास श्रींच्या संजीवन समाधीवर पुष्पवर्षा, आरती ,घंटानाद होणार आहे.
ML/ML/SL
28 Nov. 2024