कोपरी पूल आजपासून पूर्ण क्षमतेने
ठाणे, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाणे – मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर जोडणाऱ्या शहरांमधील वाहतूक कोंडी साठी अत्यंत तापदायक ठरणाऱ्या कोपरी पुलाच्या पूर्ण क्षमतेच्या मर्गिकांचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं, खा श्रीकांत शिंदे , आ संजय केळकर , प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे आदी यावेळी उपस्थित होतेKopri Bridge at full capacity from today
आधीची स्थिती काय
मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा ठाणे रेल्वे रुळांवरील दोन पुल अत्यंत अरुंद होते , त्यात वाढ करून आणखी चार मार्गिका दोन्ही बाजूने नव्याने बांधण्यात आल्या होत्या, त्या सुरूही झाल्या मात्र मूळ मार्गिका जुन्याच राहिल्याने त्याही आता नव्याने रुंद करून नवीन बांधण्यात आल्या आहेत त्याचे उद्घाटन आज झाल्यानं हा मार्ग आता आठ पदरी झाला असून त्यामुळे कायम असणारी वाहतूक कोंडी ची परिस्थिती आता असणार नाही
ML/KA/PGB
9 Feb. 2023