Kharif Season: शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
नवी दिल्ली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खरीप हंगाम (Kharif Season)2022-23 साठी 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ही योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी आहे.
अधिसूचित पिकांसाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कृषी विभागाने असेही नमूद केले आहे की अधिसूचित पिकांसाठी खातेदारांव्यतिरिक्त, एकत्रित किंवा भाडेतत्त्वावर लागवड करणारे शेतकरी या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीम पातळी निश्चित करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत, वास्तविक दराने प्रीमियम आकारला जाईल. शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त्याचा भार कमी करण्यासाठी, शेतकऱ्यांनी भरावा लागणारा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के आणि नगदी पिकांसाठी 5 टक्के ठेवण्यात आला आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेची ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
HSR/KA/HSR/ 05 July 2022