खारघर-नेरूळ कोस्टल रोड आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कोर्टात

 खारघर-नेरूळ कोस्टल रोड आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कोर्टात

खारघर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  खारघर ते नेरूळच्या जलवाहतूक जेट्टीपर्यंतच्या सिडकोने प्रस्तावित केलेल्या कोस्टल रोडला सीआरझेड अर्थात सागर किनारा प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. मात्र, प्रस्तावित रस्त्यात होणारी पर्यावरणीय हानी पाहता हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे.

सीआरझेडच्या १६२ व्या बैठकीत ही मंजुरी मिळाल्याने सिडकोला मोठा दिलासा मिळाला आहे. हा प्रस्तावित रस्ता खारघरच्या सेक्टर १६ येथून सुरू होणार असून तो ९.६ किलोमीटर लांबीचा आहे. हा रस्ता सायन-पनवेल महामार्गाला ओलांडून बेलापूर जलवाहतूक जेट्टीलाही जोडण्यात येणार आहे. पुढे तो पाम बीच मार्ग ओलांडून नेरूळ जेट्टीपर्यंत असणार आहे. या मार्गासाठी ३८.४५ हेक्टर जमीन लागणार आहे. यापैकी २.९८ सध्याचा रस्ता अर्थात १०.२१ हेक्टर जागा सिडकोच्या ताब्यात आहे.Kharghar-Nerul Coastal Road now in the court of Union Ministry of Environment

ML/KA/PGB
28 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *