बदलत्या हवामानानुसार आता नवे सिंचन प्रकल्प

 बदलत्या हवामानानुसार आता नवे सिंचन प्रकल्प

मुंबई, दि २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्याच्या बदलत्या हवामानानुसार पावसाची बदललेली शैली , ठिकाणं, नद्यांचे बदललेले प्रवाह याचा नव्याने अभ्यास करून ते केंद्रीय आणि राज्याच्या प्राधिकरणासमोर मांडून मगच नव्या प्रकल्पांचा विचार केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरच्या लक्षवेधी सूचनेवर विधानसभेत दिली.

अशोक चव्हाण यांनी ती उपस्थित केली होती, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील सापळी धरणाचे रखडलेले काम, त्यामुळे नांदेड , हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यात सिंचन क्षमता अपूर्ण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावर उपाय म्हणून ५८२ दश लक्ष घन मी पाणी इतकी असलेली तूट भरून काढण्यासाठी दिगडी , गोजेगाव आणि खरबे इथून ७८१ दश लक्ष घन मीटर पाणी आणलं जाईल अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

ML/KA/SL

28 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *