हिंदूंना धमकावत, भारतीय दूतावास बंद करण्याची कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी

ओटावा, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू दिवसेंदिवस भारताविरुद्ध जहाल भूमिका घेत कुरघोड्या करत आहे.नुकतेच त्याने 2 नवीन व्हिडिओ जारी केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये तो कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना धमकावत आहे. हिंदूंचा देश भारत असून त्यांनी कॅनडा सोडून भारतात परतावे, असे शीख फॉर जस्टिस (एसएफजे) दहशतवादी म्हणत आहेत. जे शीख खलिस्तानचे समर्थक आहेत तेच कॅनडात राहतील.
भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू म्हणाला की, कॅनडाची जमीन फक्त खलिस्तानींसाठी आहे. खलिस्तानी नेहमीच कॅनडाच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि त्यांचा इथल्या राज्यघटनेवर विश्वास आहे. दहशतवादी पन्नू म्हणाला की, कॅनडाच्या राज्यघटनेनुसार हिंदू येथे राहू शकत नाहीत. त्यांचा देश भारत आहे. येथे राहण्यासाठी त्यांना धर्म बदलावा लागेल.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये पन्नू म्हणाले की, व्हँकुव्हर, ओटावा आणि टोरंटो येथील भारतीय दूतावास 25 सप्टेंबरला बंद होतील. दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाच्या सरकारने केल्यानंतर शिख्स फॉर जस्टिसने (SFJ) डेथ ऑफ इंडिया (भारत मुर्दाबाद) ची हाक दिली आहे. दहशतवादी पन्नू म्हणाला की, 25 सप्टेंबर रोजी तो “डेथ टू इंडिया – बाल्कनाइज” मोहीम जागतिक स्तरावर सुरू करणार आहे.
SL/KA/SL
21 Sept. 2023