उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनामुळे बुजवले खड्डे

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनामुळे बुजवले खड्डे

मुंबई, दि २७
गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर या ठिकाणी शिवसेना (शिंदे) स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ यांच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त मराठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या साहित्य संघ मंदिराच्या बाहेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते हे खड्डे गेल्या अनेक महिन्यापासून तसेच औषध होते परंतु आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला येणार असल्याने महापालिकेचेवतीने हे खड्डे त्वरित बुजवण्यात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यामुळे हे खड्डे बुजवले गेले अशी चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात रंगली.
आम्ही अनेक वर्षे याच परिसरामध्ये राहतो परंतु गेल्या अनेक महिन्यापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्याची वारंवार तक्रार करून देखील हे खड्डे बुजवले गेले नाही परंतु आज शिंदे साहेबांचे आगमनामुळे हे खड्डे संपूर्णपणे बुजवण्यात आल्याबद्दल आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून आभार मानतो. KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *