केदार शिंदेच्या ‘महाराष्ट्र शाहीर’चा टिझर प्रदर्शित

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘महाराष्ट्र शाहीर’ या केदार शिंदे यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टिझर आज प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते हा टिझर लाँच करण्यात आला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीने प्रमुख भूमिका साकारली आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या टिझरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दमदार अंदाजात झळकत आहे. या टिझरची सुरुवात अंकुश चौधरी साकारत असलेल्या शाहीर साबळे यांची झलक दिसण्यापासून होते. त्या पाठोपाठ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, लता मंगेशकर यांची झलकही या टिझरमध्ये पाहायला मिळते.
विशेष बाब म्हणजे या चित्रपटातून केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अंकुश आणि सना यांच्यासह अभिनेत्री अश्विनी महांगडे हीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे. तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यात लता मंगेशकरांची भूमिका साकारत आहे.
28 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला अजय–अतुल यांनी संगीत दिले आहे.
SL/KA/SL
20 March 2023