भाजपा म्हणजे भ्रष्ट्राचाराचा मॉल – करुणा मुंडे
मुंबई, दि २२-:
स्वराज्य शक्ती सेना पक्षाने मुंबईतील इतर सहा पक्षांशी आज आघाडी केली. मुंबई पालिका निवडणुकीत ६ जागांवर आपले उमेदवार उभे करणारा असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी आज सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. जो पर्यंत ईव्हीएमला विरोध आपण करत नाही, तो पर्यत भाजपाच सतेत येणार.
भाजपा म्हणजे भ्रष्ट्राचाराचा मॉल आहे, अशी टीका ही त्यांनी यावेळी केली.
त्यानंतर करुणा मुंडे माध्यमांशी बोलत होत्या. मुंबईत आम्ही सहा पक्षासोबत निवडणूक लढवित आहोत. मी स्वतःच एक नंबरची स्टार प्रचारक आहे. मला कोणाची गरज नाही. भाजपाला गरज असेल तर त्याची आमच्या पक्षाशी चर्चा करावी. पालिकेत जरी आमचे सर्व नगरसेवक निवडूक आले. तरी आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राहणार आहोत. मला फक्त एकदा विधानसभेवर जाऊ द्या, मग पहा मी धुनभाऊंचे काय करते, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.
एमआयएमसारखे पक्ष आणि निवडणुकीत तयार होणाऱ्या विविध पक्षांच्या आघाड्या या भाजपाची बी टीम म्हणून काम करतात. तेव्हा भ्रष्ट्राचारी भाजपाला रोखायचे असेल तर ईव्हीएमला जोरदार विरोध व्हायला हवा. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्हाला भरघोस यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.KK/ML/MS