लंडन सिटी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात कर्नाटकाचा झेंडा फडकला…
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोणत्याही देशात असलो तरी आपल्याला मायदेशाची,मायभूमीची ओढ कायमच असते. लंडन सिटी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या कर्नाटक रहिवासी एका विद्यार्थ्याने पदवीप्रदान सोहळ्यात असे काही केले की यामुळे प्रत्येक कर्नाटकवासियांना त्याचा अभिमान वाटला.
कर्नाटकाचा रहिवासी असणारा हा विद्यार्थी लंडन येथील सिटी विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेला होता. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर होणाऱ्या पदवीप्रदान सोहळ्यात या विद्यार्थ्यांने मायभूमीची आठवण ठेवत एक कृत्य केले. या विद्यार्थ्यांने चक्क पदवी घेण्यासाठी रंगमंचावर जाताना कर्नाटकाचा झेंडा हातात नेला. आणि वर गेल्यावर सभागृहाकडे बघत त्याने आपल्या राज्याचा झेंडा फडकावला.Karnataka flag hoisted at London City University’s graduation ceremony
लंडन येथील सिटी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यातील हा प्रसंग असून सदर विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ लंडन येथील सिटी विद्यापीठातील आहे. पदवी घेण्यासाठी जात असताना त्याने स्टेजवर झेंडा फडकावला हे दृश्य या व्हिडिओत दिसत असून हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.
दरम्यान, हिंदुस्तान टाईम्स या वृत्तवाहिनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ अपलोड केला असून या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर ८२ हजार युजर्सने हा व्हिडिओ लाईक केला आहे.
ML/KA/PGB
24 Jan. 2023