महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून दगडफेक
बेळगाव, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिरेबागवाडी इथल्या टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आज दगडफेक करण्यात आली. बेळगाव हिरेबागवाडी इथं महाराष्ट्र पासिंगचे ट्रक लक्ष्य करण्यात आले आहेत.
यात ६ ट्रकचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्याविरोधात कन्नड रक्षण वेदिकांची घोषणाबाजी सुरू असून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे ट्रक रोखून त्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी कन्नड रक्षण वेदिका आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
कन्नड रक्षण वेदिकाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हिरेबागवाडी इथं महाराष्ट्राचे ट्रक रोखून धरले आहेत. कार्यकर्ते कन्नड रक्षण वेदिकेचे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी करत आहेत.
ट्रकच्या टपावर चढून त्यांनी आंदोलन केलं . कर्नाटकच्या या आगळीकीवर महाराष्ट्रातील नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान कर्नाटककडून महाराष्ट्रातील
ट्रकवर झालेल्या हल्ल्याचा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत State Industries Minister Uday Samant यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
कर्नाटकनं महाराष्ट्रातील जनतेचा अंत पाहू नये. अशाप्रकारच्या घटना करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना करू”, असं उदय सामंत म्हणाले.
ML/KA/PGB
6 Dec .2022