दादर येथे कबड्डी स्पर्धा

 दादर येथे कबड्डी स्पर्धा

मुंबई, दि २९
अमर हिंद मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असो. च्या मान्यतेने राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दादर येथील अमर हिंद मंडळाच्या पटांगणावर दि. 30 डिसें. ते ०२ जाने. २०२५ या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई शहरचे १०, मुंबई उपनगरचे ३, ठाण्याचे २, पालघरचे २, तर रत्नागिरीचा १ अशा १८ नामवंत संघाना सहभाग देण्यात आला आहे. या १८ संघांची ६ गटात विभागणी करण्यात आली असून स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येईल. स्पर्धा सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात एका मॅटच्या क्रीडागणांवर खेळविली जाईल.

स्पर्धेत अंतिम विजयी होणाऱ्या संघास

स्व. उमेश शेनॉय चषक व रोख रु. तीस हजार (₹३००००/-), उपविजयी संघास चषक व रोख रु. वीस हजार २००००/-) प्रदान करण्यात येतील. उपांत्या उपविजयी दोन्ही संघाना प्रत्येकी चषक व रोख रु. दहा हजार (₹१००००/-) देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या खेळाडूस तसेच उत्कृष्ट चढाई व पकडीच्या खेळाडूस प्रत्येकी सायकल देऊन सन्मानीत करण्यात येईल. त्याचं बरोबर प्रतिदिनचा मानकरी ठरणाऱ्या खेळाडूस स्मार्ट वॉच देऊन गौरविण्यात येईल.

मुंबई शहरच्या संस्कृती प्रतिष्ठान विरुद्ध रनागिरीच्या संघर्ष मंडळात पहिली लढत दि. २९ डिसें. रोजी दुपारी ०३-३० वा. होऊन या स्पर्धेचा शुभारंभ होईल. स्पर्धेची गटवारी खालील प्रमाणे, ती आज स्पर्धा प्रमुख साईनाथ काळसेकर यांनी सर्व प्रसार माध्यमा करिता जाहीर केली. कुमार गट अ गट : १) अमर मंडळ-मुंबई शहर, २) संस्कृती प्रतिष्ठान-मुंबई शहर, ३) संघर्ष मंडळ रत्नागिरी.

ब गट ः- १) नवोदित संघ-मुंबई शहर, २) सिद्धार्थ मंडळ-उपनगर, ३) ग्रीफिन्स जिम.-ठाणे. क गट :- १)गुड मॉर्निंग स्पोर्टस् -मुंबई शहर, २) गोल्फादेवी मंडळ-मुंबई शहर, ३) श्री सिद्धिविनायक मंडळ-उपनगर,

ड गट : १) सिद्धिप्रभा फौंडेशन-मुंबई शहर, २) साऊथ कॅनरा स्पोर्टस् -मुंबई शहर. KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *