वक्फ बोर्ड विधेयकासाठी संयुक्त चिकित्सा समिती जाहीर
नवी दिल्ली,दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क):
वक्फ बोर्ड विधेयकावरून काल लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला होता.विरोधकांच्या आक्षेप आणि प्रचंड विरोधानंतर हे विधेयक लोकसभेत कोणतीही चर्चा न होता जेपीसीकडे पाठवण्यात आले होते.त्यानंतर आज लोकसभेने
वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) प्रस्ताव स्वीकारला. या समितीत 31 सदस्य असतील. लोकसभेचे 21 आणि राज्यसभेचे 10 सदस्य असतील. या समितीला संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करावा लागणार आहे.
JPC आहेत हे 21 सदस्य
1. जगदंबिका पाल (भाजप) 2. निशिकांत दुबे (भाजप) 3. तेजस्वी सूर्या (भाजप) 4. अपराजिता सारंगी (भाजप) 5. संजय जैस्वाल (भाजप) 6. दिलीप सैकिया (भाजप) 7. अभिजीत गंगोपाध्याय (भाजप) 8. श्रीमती डीके अरुणा (YSRCP) 9. गौरव गोगोई (काँग्रेस) 10. इम्रान मसूद (काँग्रेस) 11. मोहम्मद जावेद (काँग्रेस) 12. मौलाना मोहिबुल्ला (एसपी) 13. कल्याण बॅनर्जी (TMC) 14. ए राजा (द्रमुक) 15. एल एस देवरायालू (टीडीपी) 16. दिनेश्वर कामत (JDU) 17. अरविंत सावंत (शिवसेना, ठाकरे गट) 18. सुरेश गोपीनाथ (राष्ट्रवादी, शरद पवार) 19. नरेश गणपत मस्के (शिवसेना, शिंदे गट) 20. अरुण भारती (लोजप-आर) 21. असदुद्दीन ओवेसी (AIMIM)
SL/ ML/ SL
9 August 2024